"सेवा है यज्ञकुण्ड, समिधा सम हम जले...॥" ही दृष्टी ठेवून "विघ्नहर्ता प्रतिष्ठान"ने आपले हे कार्य आरंभिले आहे. आपत्तीच्या वेळी मानवतेच्या रक्षणासाठी जे जे शक्य असेल आणि आवश्यक असेल ते ते कार्य करणे, त्यासाठीची नित्यसिद्ध शक्ती उभी करणे अशी या कार्याची थोडक्यात रूपरेषा आहे.
भारतीय समाजाला आजवर ज्या विविध आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे, त्या लक्षात घेवून त्या आपत्तींच्या वेळी मदतीला धावून जात, समाजाचे रक्षण करणारी नित्य सिद्ध शक्ती समाजातूनच उभी राहिली पाहिजे. त्यासाठीच, प्रत्येकवेळी सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहाता, स्वत:च्या वस्तीचे स्थानिक साधने वापरून रक्षण कसे करता येईल, त्याचे प्रशिक्षण तरूण वर्गाला देण्याचा हा प्रयत्न आहे.
आपल्या वस्ती - परिसरातील नागरिकांची मोठी रक्तगट सूची सर्वप्रथम तयार करावी.
© 2010 Vighnaharta Pratishthan, Mumbai. All rights reserved worldwide. | Site created by Atulraj Prakashan, Mumbai.