विविध आपत्तीत अत्यंत साधेपणाने परंतु त्वरेने आणि शिस्तबद्धपणे मदत कार्य संघटित करणे गरजेचे असते. बाहेरून कुठूनतरी मदतीची वाट पाहात बहुमूल्य वेळ वाया घालवणे जीव वाचविण्याच्या दृष्टीने परवडण्यासारखे नसते. त्यामुळे स्थानिक समाजालाच प्राणरक्षा तंत्रांचे आणि संघटित मदतीचे प्रशिक्षण गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रत्त्यक्ष कार्य करणारी "विघ्नहर्ता प्रतिष्ठान" ही संस्था आहे.
त्याचबरोबर काही गोष्टी प्रत्यक्ष संघटित करण्याचाही आम्ही प्रयत्न करीत आहोत.
लातूरच्या भूकम्पापासून ते अगदी २६/११, २००८ च्या मुम्बईवरील हल्ल्यापर्यंत मदत कार्य संघटित करताना आम्हा मित्रांना आलेल्या विविध अनुभवांचा लाभ हे कार्य बांधताना घेतला आहे.
सेवाकार्य
विशेषता
आवाहन
श्री गणपतीचरणी समर्पित या जीवरक्षणाच्या कार्यात भारतभक्त तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही काळाची गरज आहे. आपापला मुख्य व्यवसाय सांभाळताना जीवरक्षणाचे, समाज रक्षणाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
"विघ्नहर्ता प्रतिष्ठान" च्या वतीने आम्ही भारतभक्त तरूणांना या महान कार्यात सहभागी होण्यासाठी हे आवाहन करीत आहोत.
© 2010 Vighnaharta Pratishthan, Mumbai. All rights reserved worldwide. | Site created by Atulraj Prakashan, Mumbai.